We are your go-to provider for agriculture related education solutions in Jalgaon district.
Read more about us >>कै. नथ्थु सुपडू वाणी (चांदसरकर) |
शिस्तप्रिय म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या श्री. नाना वाणी यांनी ग्रामीण भागातील युवकांच्या शेंक्षणिक विकासासाठी सन १९९० मध्ये कें. नथ्थु सूपडू वाणी चांदसरकर चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. हे विद्यालय राहुरी कॄषी विद्यापीठाशी सलग्न करत विद्यापीठाचे विविध अभ्यासक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले आहेत.
कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था हि त्या देशातील कॄषी विकासावर आधारित असते. कॄषी क्षेत्राचा जेवढा विकास अधिक तेवढा त्या देशाचा विविध पातळीवरील विकास अधिक. भारतातील ९० टक्के लोकांचा मुख्य व्यवसाय शेती हा आहे. बदलत्या काळानुसार शेती व शेतीच्या तंत्रज्ञानातही बदल होत आहे. हा बदल व आधुनिक शेतीचे नवतंत्रज्ञान नव्या पिढीस अवगत करण्यासाठी विद्यालयात शेती व शेतीला पूरक असे विविध अभ्यासक्रम सुरु केले आहेत. विद्यार्थ्यांना नुसते शिक्षण देण्यावर न थांबता त्यांना बायोगॅस, गांडूळखत, दुग्ध-व्यवसाय, रोपवाटिका संवर्धन, शेतमाल प्रक्रिया, माती-पाणी परीक्षण यासारखे विविध जोड व्यवसायांचे प्रात्यक्षिक ही केले जाते. त्यामुळे विद्यार्थी शिक्षण पूर्ण करत असतांनाच स्वयं रोजगारातून अर्थाजनही करू लागतो.
एकूणच शेती व्यवसायातून ग्रामीण भागातील युवकांना सक्षम करण्याचे हे व्रत घेत त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ट्रस्ट निरंतर सेवारत राहणार आहे.