कॄषी क्षेत्रातील हरीत क्रांतीसाठी वचनबद्ध

कोणत्याही आधुनिक समाजातील युवकांना जागतिक स्तरावरील शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. युवकांना सभ्य, आत्मनिर्भर आणि प्रगतीशील समाजाच्या निर्मिती योग्य बनवने ही एक लांबलचक प्रक्रिया आहे. भारतीय व्यवस्थेत शहरी व ग्रामीण असे दोन भाग आहेत. शहरी भागात उच्च शिक्षणाच्या अनेक संधी व शेक्षणिक संस्था आहेत. मात्र ग्रामीण भागात अशा शेक्षणिक सुविधा व संधी अल्प प्रमाणात आहेत. खेडयाकडे चला, खेड्यांचा विकासातच राष्ट्राचा खरा विकास असल्याचे राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणत ते खरेच आहे. शहरांचा विविध पातळ्यांवर विकास झालेला आहे. त्या मानाने ग्रामीण भागांचा विकास झालेला नाही. या विकासाची पहिली पायरी म्हणजे ग्रामीण भागात शिक्षणाच्या मुलभूत आणि व्यावसायिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे.

असे शिक्षण कि जे ग्रामीण भागाशी व त्याच्या रोजच्या व्यवहाराशी मिळते जुळते असेल. उच्च शिक्षितांनाच प्रगती करता येते, असे नाही तर अल्पशिक्षित, व्यवसायाशी सबंधित शिक्षणानेही प्रगती करता येते. हे सिद्ध करण्यासाठी श्री. नानासाहेब वाणी यांनी कें. नथ्थु सूपडू वाणी चांदसरकर चॅरिटेबल ट्रस्टची सन १९९० मध्ये स्थापना केली. हा ट्रस्ट पूर्णपणे खाजगी असून गुणवत्तेच शिक्षण देत त्याचा ग्रामीण भागात प्रसार करण्याचा आश्वासन देतो.

त्यासाठी चांदसरच्या गिरीजा नगरात २०० एकर जागेत शेंक्षणिक परिसराची उभारणी केली आहे. जळगाव शहराजवळील धरणगाव तालुक्यातील चांदसर या गिरणा नदीच्या काठावर या शेंक्षणिक परिसराचा विस्तार केला आहे. यात ग्रामीण भागातील कॄषी विषयक गरजा लक्षात घेत महाराष्ट्र शासन व युजीसी मान्य राहुरीच्या महात्मा फुले कॄषी विद्यापीठाचे विविध शिक्षणक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. या परिसरातच मुला-मुलींची निवासाची स्वतंत्र पणे व्यवस्थाही करण्यात आलेली आहे.

कें. नथ्थु सूपडू वाणी चांदसरकर चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक म्हणून नामवंत व्यापारी उद्योजक, शिक्षणतज्ञ यांचा समावेश केलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण व व्यवसाय करण्याचे शिक्षण मिळते. ज्यामुळे ग्रामीण भागातील शेतीचे सध्या असलेले चित्र बदलण्यास मदत होईल. या कॄषी विषयक शिक्षणातून विद्यार्थी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत कमी श्रमात, पाण्यात अधिक सकस व दर्जेदार उत्पादन घेत भारत पुन्हा हरित क्रांती दाखवतील असा विश्वास हा ट्रस्ट व ट्रस्टचे सर्व विश्वस्त व्यक्त करतात.